मानखुर्दमध्ये ८ वर्षीय चिमुरडीची हत्या चआईला अटक; अनैतिक संबंध

By Admin | Updated: March 31, 2015 01:51 IST2015-03-31T01:51:35+5:302015-03-31T01:51:35+5:30

अनैतिक संबंध असलेल्या इसमासोबत भांडण सुरू असताना मारहाणीत ८ वर्षीय मुलीचाच मृत्यू झाल्याची घटना रविवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे.

Cheema, 8-year-old girl was arrested in Mankhurd; Immoral relationship | मानखुर्दमध्ये ८ वर्षीय चिमुरडीची हत्या चआईला अटक; अनैतिक संबंध

मानखुर्दमध्ये ८ वर्षीय चिमुरडीची हत्या चआईला अटक; अनैतिक संबंध

मुंबई : अनैतिक संबंध असलेल्या इसमासोबत भांडण सुरू असताना मारहाणीत ८ वर्षीय मुलीचाच मृत्यू झाल्याची घटना रविवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे.
तनिषा ओळे (८) असे मृत मुलीचे नाव असून, ती तिच्या आईसोबत मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाउंड परिसरात राहत होती. मुलीचे वडील मच्छिंद्र ओळे यांना दारूचे व्यसन असल्याने ते गावीच राहत होते. आरोपी उषा ओळेचे एका ३० वर्षीय इसमासोबत अनैतिक संबंध होते. रविवारी सकाळी आरोपी आणि महिलेचे भांडण झाले होते. याच दरम्यान या दोघांनी या मुलीवरच राग काढत तिला बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाल्याने आरोपीने मुलीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने मुलीचा मृतदेह त्याच ठिकाणी सोडून पळ काढला
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चौकशी केली असता, ती खेळताना पडल्याची माहिती तिच्या आईने दिली. सायंकाळी मुलीचे वडील गावावरून परतल्यानंतर त्यांनी हत्येचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. शवविच्छेदनाचा अहवालात मुलीचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन अटक केली. तर फरार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश गोसावी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cheema, 8-year-old girl was arrested in Mankhurd; Immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.