मेट्रो भरतीत बोगस जाहिरातीद्वारे फसवणूक
By Admin | Updated: September 17, 2014 02:45 IST2014-09-17T02:45:49+5:302014-09-17T02:45:49+5:30
मेट्रो-1 रेल्वे भरतीच्या खोटय़ा जाहिराती प्रसिद्ध करुन बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करण्याचा फंडा काही संस्थांकडून केला जात आहे.

मेट्रो भरतीत बोगस जाहिरातीद्वारे फसवणूक
मुंबई : मेट्रो-1 रेल्वे भरतीच्या खोटय़ा जाहिराती प्रसिद्ध करुन बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करण्याचा फंडा काही संस्थांकडून केला जात आहे. काही उमेदवारांना बोगस नियुक्ती पत्रे देवून त्यांच्याकडून अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. याबाबत तरुणांकडून होत असलेल्या विचारणामुळे मुंबई महानगर विकास प्राधीकरण (एमएमआरडीए) व मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे अधिकारी हैराण झालेले आहेत. या फसवणूकीपासून सावध रहाण्याचे त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
अंधेरी ते वर्सोवा या मार्गावर धावत असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये विविध तांत्रिक व प्रशासकीय पदाची भरतीची जाहिरात कथित संस्थेकडून वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या काही तरुणांना प्राधीकरणाच्या नावे नियुक्तीची पत्रे देण्यात आलेली आहे. त्यामध्ये 666.े4ेुं्रेी311ू14्र3ेील्ल3.्रल्ल हे संकेतस्थळ नमूद करण्यात आले आहे. ही बनवेगिरी असून युवकांनी सावध रहावे, असे आवाहन प्राधीकरणाचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी केले आहे.