एटीएम बंद असल्याचा सांगून फसवणूक...वेस्टर्न
By Admin | Updated: August 17, 2014 23:53 IST2014-08-17T23:10:38+5:302014-08-17T23:53:44+5:30
एटीएम बंद असल्याचे सांगून एका टोळीने दुसर्याच्या खात्यातून १० हजार रु पये काढल्याची घटना अंधेरीत घडली.

एटीएम बंद असल्याचा सांगून फसवणूक...वेस्टर्न
मुंबई : एटीएम बंद असल्याचे सांगून एका टोळीने दुसर्याच्या खात्यातून १० हजार रु पये काढल्याची घटना अंधेरीत घडली. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
डी. एन. नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका एटीएम केंद्रात शुक्र वारी रात्री एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेली होती. तिथे तीन अनोळखी इसम आले. पैसे काढणार्या व्यक्तीचे एका खासगी बँकेत सॅलरी अकाऊंट आहे. तिघांपैकी एकाने त्याला एटीएम बिघडल्याचे सांगितले. दुसर्या एटीएम केंद्रात जाऊ, असे सांगून त्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून ठेवून तिघांनी त्याच्या खात्यातील १० हजार रु पये काढून पळ काढला. फसवणूक झाल्याचे समजल्यावर फिर्यादीने डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्र ार नोंदवली. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फूटेजच्या तपासणीनंतर तिघा चोरट्यांचा शोध लागेल, अशी माहिती डी. एन. नगर पोलिसांनी दिली.