Join us  

वीज स्वस्त! महावितरणचे दोन टक्के, तर टाटाचे दर चार टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 8:30 AM

बेस्ट ‘जैसे थे’, अदानीच्या दरात काही पैशांची वाढ होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरगुती वीजग्राहकांना एक गोड बातमी आहे. महावितरणचेवीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होत असून, अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार आहेत.१ एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या वीजदराप्रमाणे टाटाच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांच्या वीजदरात ४ टक्के कपात होईल, तर महावितरणचे दर २ टक्क्यांनी कमी होतील. दुसरीकडे अदानीच्या वीजग्राहकांच्या बिलात युनिटमागे १ ते ६ पैशांची वाढ होईल. त्यामुळे महिन्याचे बिल ३० रुपयांनी वाढणार आहे. अदानीची घरगुती ग्राहकांच्या तुलनेत व्यावसायिक वापर आणि औद्योगिक वापर असलेल्या वीजग्राहकांची बिले कमी होणार असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. बेस्टच्या दरात बदल झालेला नाही. 

विजेचे दर (प्रति युनिट/ रुपये)युनिट    बेस्ट    टाटा    अदानी    महावितरण १-१००    ३.१८    ३.४९    ४.५२    ४.७११०१-३००    ५.८१    ६.०४    ६.४७    ८.६९३०१-५००    ८.६५    ९.४९    ८.१७    ११.७४५००     १०.२१    १०.१९    ९.२७    १३.२१ व्यवसायिक     ६.२४    ६.५३    ६.७४    १०.९५ औद्योगिक     ५.९३    ६.१४    ६.५१    ६.८९

nमहावितरणच्या १०० युनिट वर्गवारीतील ग्राहकांना प्रति युनिट ४ रुपये ८२ पैशांऐवजी ४ रुपये ७१ पैसे मोजावे लागतील. n१०१ ते ३०० युनिटमधील ग्राहकांना ८ रुपये ७२ पैशांऐवजी ८ रुपये ६९ पैसे. n३०१ ते ५०० युनिटमधील ग्राहकांना ११ रुपये ७४ पैशांऐवजी ११ रुपये ७२ पैसे. n५०० युनिटवरील ग्राहकांना १३ रुपये २० पैशांऐवजी १३ रुपये २१ पैसे मोजावे लागतील. nव्यावसायिक वापर असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट ११ रुपये २० पैशांऐवजी १०.९५ पैसे, तर औद्योगिक वीज वापर असलेल्या ग्राहकांना ६ रुपये ९६ पैशांऐवजी ६ रुपये ८९ पैसे मोजावे लागतील. 

टॅग्स :वीजरिलायन्समहावितरण