चव्हाण यांची सुनावणी आज
By Admin | Updated: March 3, 2015 02:46 IST2015-03-03T02:46:57+5:302015-03-03T02:46:57+5:30
बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या आदेशाचा उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, या खासदार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे़

चव्हाण यांची सुनावणी आज
मुंबई: बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या आदेशाचा उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, या खासदार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे़
या घोटाळ्याप्रकरणी खासदार चव्हाण यांच्याविरोधात
खटला दाखल करण्यास माजी राज्यपाल के़ शंकरनारायणन् यांनी सीबीआयला परवानगी नाकारली़ त्यानुसार यातून चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला, तो न्यायालयाने फेटाळला़ त्याविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली़
मात्र न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांनीदेखील विशेष न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास
नकार दिला़ याचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी
विनंती करणारा अर्ज चव्हाण यांनी दाखल केला़ त्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली़ न्यायालयाने ही सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली़
(प्रतिनिधी)