चव्हाण यांचा फैसला आज

By Admin | Updated: March 4, 2015 02:16 IST2015-03-04T02:16:15+5:302015-03-04T02:16:15+5:30

खासदार व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या (बुधवारी) उच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे़

Chavan's decision today | चव्हाण यांचा फैसला आज

चव्हाण यांचा फैसला आज

मुंबई : बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, या काँग्रेसचे खासदार व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या (बुधवारी) उच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे़ या प्रकरणी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास माजी राज्यपाल के़ शंकरनारायणन् यांनी सीबीआयला परवानगी नाकारली़ त्यामुळे या खटल्यातून चव्हाण यांचे नाव वगळण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज सीबीआयने विशेष न्यायालयात केला़ विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळला़ त्याविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली़

Web Title: Chavan's decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.