सनदी अधिका:यांच्या बदल्या
By Admin | Updated: August 31, 2014 02:46 IST2014-08-31T02:46:12+5:302014-08-31T02:46:12+5:30
राज्य शासनाने शनिवारी सात ज्येष्ठ सनदी अधिका:यांच्या बदल्या केल्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काहीच दिवस आधी या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सनदी अधिका:यांच्या बदल्या
मुंबई : राज्य शासनाने शनिवारी सात ज्येष्ठ सनदी अधिका:यांच्या बदल्या केल्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काहीच दिवस आधी या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील हे राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे नवे महासंचालक असतील. महासंचालकपद पाच महिन्यांपासून रिक्त होते.
अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर महेश झगडे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता त्यांची परिवहन आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
सुमित मलिक हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तर एस. एस. संधू हे
महसूल विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव गिरीराज याच पदावर ग्रामविकास विभागात
गेले आहेत. त्यांच्या जागी व्ही.एस. सिंह हे रोहयोचे नवे प्रधान सचिव असतील. वल्सा नायर पर्यटन विभागाच्या नवीन सचिव
असतील. (विशेष प्रतिनिधी)