Join us
Daily Top 2Weekly Top 5

चर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:48 IST

पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील बाजू पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील बाजू पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. शुक्रवार, २८ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे प्रवाशांनी उत्तर दिशेकडील पायºयांचा वापर करण्याच्या सूचना रेल्वेने दिल्या आहेत.पश्चिम रेल्वेवरील स्थानकांतील पुलांसह रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि पादचारी पूल (एफओबी) या पुलांची पाहणी नुकतीच करण्यात आली. या पाहणीनुसार, चर्नी रोड स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेला केल्या आहेत. पुलाच्या दक्षिण दिशेला असलेल्या पायºयांची त्वरित डागडुजी करण्याचा सल्ला विशेष पथकाने पश्चिम रेल्वेला दिला होता. यानुसार शुक्रवार, २८ सप्टेंबर ते सोमवार, २६ नोव्हेंबर या ६० दिवसांत हे काम केले जाणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

टॅग्स :बातम्या