Join us
Daily Top 2Weekly Top 5

साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र, विशेष न्यायालय दखल घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 07:16 IST

मंगळवारी या आरोपपत्राची विशेष न्यायालय दखल घेण्याची शक्यता आहे. 

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मंगळवारी या आरोपपत्राची विशेष न्यायालय दखल घेण्याची शक्यता आहे. 

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट उभारण्यात आले. तसेच ते उभारताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे. ईडीने आतापर्यंत शिंदे गटातील रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अटक केली आहे. तसेच तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनाही अटक केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यावर ईडीचा संशय आहे. अटकेच्या भीतीने परब यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी ईडीने आरोपींवर २ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात २० साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे मंगळवारी या आरोपपत्राची दखल घेतील.