महापालिकेची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांवर

By Admin | Updated: January 10, 2015 01:48 IST2015-01-10T01:48:24+5:302015-01-10T01:48:24+5:30

शहराच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे.

In charge of the municipal charge in charge | महापालिकेची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांवर

महापालिकेची धुरा प्रभारी अधिकाऱ्यांवर

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
शहराच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे. ठरावीक अधिकाऱ्यांवर एकापेक्षा जास्त खात्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.
राज्यातील प्रमुख व श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश होत आहे. पालिकेच्या आयुक्तपदावर नुकतीच दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन आयुक्तांसमोर शहराच्या विकासाबरोबर महापालिकेच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडणे व प्रशासनामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आव्हान आहे. पालिकेमध्ये अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांची मोठी कमतरता आहे. यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांची धुरा द्यावी लागत आहे. मुख्यालय उपआयुक्त म्हणून काम करणाऱ्या जगन्नाथ सिन्नरकर यांच्याकडे प्रशासन, जनसंपर्क, विष्णुदास भावे, अग्निशमन, आपत्कालीन, भांडार, राजशिष्टाचार या विभागांची धुरा सोपविण्यात आली आहे. जिथे कमी तिथे सिन्नरकर अशी पालिकेच्या कारभाराची स्थिती झाली आहे. उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनाही मालमत्ता, निवडणूक, नियोजन, सनियंत्रण, योजना विभाग या विभागांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे यांनाही एकाच वेळी प्रशासन, उद्यान, विष्णुदास भावेचा कारभार सांभाळावा लागत आहे. मुख्य बाजार व परवाना विभागासाठीही स्वतंत्र जागा नसून स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे यांना ते पद सांभाळावे लागत आहे. विभाग अधिकारी पदावरही कुठे लघुलेखक तर कुठे स्वच्छता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेमध्ये डॉ. संजय पत्तीवार हे अतिरिक्त आयुक्त आहेत. परंतु त्यांची पदोन्नती झाल्यापासून त्यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली नसून हे पद शोभेसाठी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पालिकेची पूर्ण आरोग्य यंत्रणा प्रभारी अधिकारी चालवत आहेत. मुख्य आरोग्य अधिकारी, कुटुंब कल्याण अधिकारी, हिवताप अधिकारी, क्षयरोग, शहर आरोग्य व प्रशिक्षण अधिकारी सर्व पदांवर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेचे काम प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे. एलबीटी विभागाचे उपआयुक्तांची मुदत संपली आहे. परंतु त्या जागेवर अनुभवी अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे विद्यमान अधिकाऱ्यांना वाढीव मुदत द्यावी लागत आहे. अतिक्रमण उपआयुक्तपदावरही सहायक आयुक्तांची वर्णी लावण्यात आली आहे.

च्महापालिकेच्या कामकाजामध्ये सचिव हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. परंतु चंद्रकांत देवकर निवृत्त झाल्यापासून चित्रा बाविस्कर यांच्याकडे या पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. पूर्णवेळ सचिव नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
च्विधी विभागाची धुराही कनिष्ठ विधी अधिकारी अभय जाधव सांभाळत आहेत. या विभागास मुख्य विधी अधिकारी पदही नाही व जाधव यांना प्रभारीपदही सोपविण्यात आले नाही अशी स्थिती आहे.

च्महापालिकेमध्ये सहा महिन्यांपासून परिवहन व्यवस्थापक पद रिकामे आहे. त्याचबरोबर अनेक महिन्यांपासून शिक्षण अधिकारीही नाहीत. शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी हे पदही रिकामेच आहे.
च्सद्यस्थितीमध्ये दत्तात्रय नांगरे यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागास स्वतंत्र अधिकारी नसल्यामुळे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.

Web Title: In charge of the municipal charge in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.