कॉंग्रेसचा कारभार समन्वय समितीच्या हाती
By Admin | Updated: May 23, 2015 22:50 IST2015-05-23T22:50:21+5:302015-05-23T22:50:21+5:30
ठाणे शहर कॉंग्रेसचा कारभार आता समन्वय समितीच्या हाती सोपविण्यात आला आहे. या समितीत सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कॉंग्रेसचा कारभार समन्वय समितीच्या हाती
ठाणे : ठाणे शहर कॉंग्रेसचा कारभार आता समन्वय समितीच्या हाती सोपविण्यात आला आहे. या समितीत सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. जोपर्यंत अध्यक्षपदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत या समितीच्या माध्यमातून ठाणे शहर कॉंग्रेसचा कारभार चालणार आहे.
मागील महिन्यात झालेल्या स्विकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव डावलून प्रदीप राव यांना संधी दिल्याचे कारण देत ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर आणि ठाणे महापालिकेचे गटनेते विक्र ांत चव्हाण यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर गटनेतेपदी संजय घाडीगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. परंतु शहरअध्यक्षपदाचा तिढा आजही कायम आहे. शहर अध्यक्षपदासाठी कानडे गट, कांती कोळी गट आणि पूर्णेकर गट पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे या पदाचा तेढ आणखीनच वाढला आहे. परंतु शहर अध्यक्षविना कारभार कसा हाकायचा असा पेच पदाधिकाऱ्यांपुढे निर्माण झाल्याने अखेर पक्ष श्रेष्ठींनी समन्वय समितीची स्थापना केली आहे. यामध्ये नगरसेवक नारायण पवार, गटनेते संजय घाडीगावकर, मनोज शिंदे, यासिन कुरेशी यांच्यासह मोहन तिवारी आणि सुभाष कानडे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती कॉंग्रेसची सदस्य नोंदणी, पक्ष वाढविण्यासाठी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु या समितीत माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांनी मात्र दूर ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
समन्वय समितीत नारायण पवार, संजय घाडीगावकर, मनोज शिंदे, यासिन कुरेशी यांच्यासह मोहन तिवारी आणि सुभाष कानडे यांचा समावेश करण्यात आला आहे.