जैन, गुजराती समाजाकडून चरणसिंग सप्रांचा सत्कार

By Admin | Updated: September 29, 2014 05:30 IST2014-09-29T04:06:36+5:302014-09-29T05:30:02+5:30

मुलुंडमधून काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चरणसिंग सप्रा यांचा येथील जैन व गुजराती समाजाने सत्कार केला. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात नुकताच हा कार्यक्र्रम पार पडला.

Charan Singh Sapra felicitated by Jain, Gujarati community | जैन, गुजराती समाजाकडून चरणसिंग सप्रांचा सत्कार

जैन, गुजराती समाजाकडून चरणसिंग सप्रांचा सत्कार

मुंबई : मुलुंडमधून काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चरणसिंग सप्रा यांचा येथील जैन व गुजराती समाजाने सत्कार केला. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात नुकताच हा कार्यक्र्रम पार पडला.
या सत्कार समारंभाला घोगारी विशाश्रीमणी जैन समाज, झव्हेर रोड जैन संघ, तांबेनगर जैन संघ, मुलुंड जैन मित्र मंडळ, वर्धमान नगर, गोवर्धन नगर, वीणा नगर, ज्युनिअर सर्वोदय जैन संघ, श्रीमंदारजीम भक्ती मंडळ आणि अन्य मंडळांतून मान्यवर उपस्थित होते.
गेल्या २५ वर्षांमध्ये मुलुंडचा विकास मंदावला होता. मात्र सप्रा विधानपरिषद सदस्य होताच विकासाच्या वेगाने गती घेतली. मुलुंडमध्ये सत्र, ग्राहक न्यायालय, नवी स्मशानभूमी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, ट्रॉमा सेंटर, पेट्रोलपंप, नाट्यगृह निर्मिती, हरिओमनगरच्या रहिवाशांना टोलमध्ये ७५ टक्के सूट मिळावी यासाठी प्रयत्न, नाहूर रेल्वे पुलाचे रुंदीकरण, स्कायवॉक रद्द, खासगी वन जमिनीबाबतची फेरविचार याचिका सरकारने मागे घ्यावी यासाठी धडपड, पशुहत्यागृहांना विरोध, शहापूर येथील प्रसिद्ध जैन मंदिराकडे जाणे सोयीचे व्हावे यासाठी आसनगाव, आटगावदरम्यान सारओली रेल्वे स्थानकासाठी प्रयत्न, जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न या सप्रा यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करीत उपस्थितांनी येत्या निवडणुकीत सत्रा यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Charan Singh Sapra felicitated by Jain, Gujarati community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.