चपाती बनवताना बोटे चिरडली

By Admin | Updated: December 21, 2014 01:19 IST2014-12-21T01:19:16+5:302014-12-21T01:19:16+5:30

डोंगरी येथील बालसुधारगृहाच्या स्वयंपाकघरात चपाती बनवण्याचा यंत्रामध्ये १३ वर्षांच्या मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे चिरडल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली.

The chapati was shattered when the chapati | चपाती बनवताना बोटे चिरडली

चपाती बनवताना बोटे चिरडली

मुंबई : डोंगरी येथील बालसुधारगृहाच्या स्वयंपाकघरात चपाती बनवण्याचा यंत्रामध्ये १३ वर्षांच्या मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे चिरडल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी जबाबदार असलेला स्वयंपाकी विक्रम याला तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या घटनेनंतर मुलाला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तत्काळ रुग्णालयात नेण्यात आल्याने त्याच्या हाताची तीन बोटे वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र त्याच्या करंगळीला गंभीर दुखापत झाल्याने कदाचित ते कापावे लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र तरीही प्रथमत: करंगळीवर प्राधान्याने उपचार करून ती वाचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे बालसुधारगृहाचे अधीक्षक यांच्या म्हणण्यानुसार, येथे कर्मचारी वर्गाची कमतरता आहे. परिणामी येथील मुलांकडून काम करून घेतले जात होते. पण या कामाला प्रशिक्षण असे म्हणतात; हेदेखील त्यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The chapati was shattered when the chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.