अर्धवेळ ग्रंथपालांचे साखळी उपोषण
By Admin | Updated: June 13, 2014 01:06 IST2014-06-13T01:06:45+5:302014-06-13T01:06:45+5:30
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गंथपाल महासंघातर्फेअर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आजपासून आंदोलन व साखळी उपोषण

अर्धवेळ ग्रंथपालांचे साखळी उपोषण
नांदगाव : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गंथपाल महासंघातर्फेअर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आजपासून आझाद मैदानावर शेकडोच्या संख्येने ग्रंथपाल उपस्थित राहून आत्मक्लेश आंदोलन व साखळी उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील १०६७ अर्धवेळ गं्रथपालांना पुर्णवेळ करण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलनाची सुरूवात होत असतानाच माजी आमदार गंगाधर पाटणे हे आंदोलनाच्या ठिकाणी येवुन त्यांनी ग्रंथपालांच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने पूर्ण केल्याच पाहिजेत यासाठी त्यांनी बिनशर्त पाठींबा जाहिर केला.
गेल्या २० ते २२ वर्षांपासून पूर्णवेळ पदाचा कार्यभार संभाळत आहेत. गं्रथपालांना केवळ ४० टक्के वेतनावर सक्तीने राबवून त्यांना न्याय देण्यासंदर्भात हेतुपुरस्सर टोलवा टोलवी केली जात आहे. गेली अनेक वर्ष अर्धवेळ गं्रथपालांची फाईल मंत्रालयात धूळ खात पडली आहे. माध्यमिक शाळेतील गं्रथपालांना पूर्णवेळ करा, अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्वीची सेवा पेन्शन व वरिष्ठ निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरा, तसेच ग्रंथपालास केंद्राप्रमाणे शिक्षण दर्जा आदी त्यांच्या मागण्या आहेत.