Join us

मुंबई पोलीस दलात अंतर्गत फेरबदल, १७५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 06:20 IST

नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, मुंबई पोलीस दलात अंतर्गत फेरबदल करण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई : नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, मुंबई पोलीस दलात अंतर्गत फेरबदल करण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शनिवारी रात्री मुंबई पोलीस दलातील १७५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, अशोक खोत, विनायक मेर, महेश देसाई, संजय निकम, जगदीश साईल, महिला पो. नि. प्रभा राऊळ अशा तब्बल २७ अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेतच, तर वाहतूक शाखेतील ८ अधिकाºयांना पोलीस ठाण्यात नेमणूक मिळाली आहे.एकूण १५८ अधिकाºयांच्या त्या ठिकाणचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मुंबईबदली