निवडणुकीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
By Admin | Updated: October 7, 2014 02:23 IST2014-10-07T02:23:01+5:302014-10-07T02:23:01+5:30
विधानसभा निवडणूक प्रक्रियेतंर्गत काही अडचणी उद्भवू नयेत. निवडणूकाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करता यावी.

निवडणुकीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
मुंबई : विधानसभा निवडणूक प्रक्रियेतंर्गत काही अडचणी उद्भवू नयेत. निवडणूकाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करता यावी. ऐनवेळी वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागू नये म्हणून ठिकठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, काही ठिकाणी नो-पार्किंग झोनही तयार करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत बोरीवली पश्चिमेकडील उध्याश्रम रोड आणि क्रॉस रोड येथे वाहने उभी करता येणार नाहीत. शिवाय फॅक्टरी लेनमार्गापासून शिंपोलीपर्यंतचा रस्त्यावर वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दहिसर पश्चिम येथील रुस्तम इराणी मार्ग, जयवंत सांवत मार्गासह वामनराव भोईर मार्गावर वाहने उभी करता येणार नाहीत.
शिवाय वामनराव भोईर मार्ग, सुधीर फडके फ्लायओव्हरपासून रुस्तम रॉयल इमारतीपर्यंत वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दहिसर पूर्वेकडील शिव वल्लभ क्रॉस रोड येथे वाहने उभी करता येणार नाहीत. शिवाय शिव वल्लभ क्रॉस रोडवर वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.