महिला डब्यातील रात्रीच्या सुरक्षा वेळेत बदल

By Admin | Updated: August 22, 2015 01:40 IST2015-08-22T01:40:15+5:302015-08-22T01:40:15+5:30

लोकलमध्ये रात्री प्रवास करताना एका युवतीचा विनयभंग झाल्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेला

Changes in night coaches for women coaches | महिला डब्यातील रात्रीच्या सुरक्षा वेळेत बदल

महिला डब्यातील रात्रीच्या सुरक्षा वेळेत बदल

मुंबई : लोकलमध्ये रात्री प्रवास करताना एका युवतीचा विनयभंग झाल्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रात्रीच्या सुरक्षा वेळेत काही प्रमाणात बदल करण्याचा विचार रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे. त्यासाठी महिला प्रवासी, प्रवासी संघटना आणि सामाजिक संघटनांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
लोकलमधून प्रवास करताना पहाटेच्या किंवा रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांना छेडछाड, विनयभंग, अश्लील हावभाव तसेच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांना अहवाल सादर केला. यात महिलांच्या डब्यांमधील रात्रीच्या सुरक्षा वेळेत बदल करण्याचे सुचवण्यात आले आहेत. रात्री नऊ वाजल्यापासून सीएसटी किंवा चर्चगेटला येणाऱ्या लोकलमधील महिला डब्यात तर रात्री दहा वाजल्यापासून सीएसटी आणि चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात रेल्वे पोलीस नेमण्याचा विचार आहे. याबाबत मधुकर पाण्डेय यांनी सांगितले की, सध्या सरसकट रात्री साडेआठ ते सकाळी सहापर्यंत महिला डब्यात पोलीस तैनात असतात. मात्र रात्रीचा प्रवास महिला प्रवाशांना असुरक्षित वाटतो. हे पाहता डाऊनला जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यात रात्री दहा वाजेपर्यंत बरीच गर्दी असते. तर अपला येणाऱ्या ट्रेनमध्येही महिला डब्यात गर्दीचे चित्र असते. त्यामुळेच रात्रीच्या प्रवासातील
महिला डब्यातील सुरक्षेत हा बदल करण्याचा विचार केला जात आहे. परंतु तत्पूर्वी प्रवाशांची मते जाणून घेणार आहोत, असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in night coaches for women coaches