गुणपत्रिकेत फेरबदल; शिक्षकाविरोधात गुन्हा
By Admin | Updated: May 24, 2015 23:02 IST2015-05-24T23:02:16+5:302015-05-24T23:02:16+5:30
शहरातील चाचा नेहरू हिंदी हायस्कूलमधील रविंद्रनाथ गणेशदत्त त्रिपाठी(४८) या शिक्षकाने बीएडची पदवी मिळविण्याकरिता

गुणपत्रिकेत फेरबदल; शिक्षकाविरोधात गुन्हा
भिवंडी : शहरातील चाचा नेहरू हिंदी हायस्कूलमधील रविंद्रनाथ गणेशदत्त त्रिपाठी(४८) या शिक्षकाने बीएडची पदवी मिळविण्याकरिता आपल्या शैक्षणिक पदवीच्या गुणपत्रिकेत बदल केल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशात बस्ती येथील एडीआयएन डीग्री कॉलेजमध्ये त्याने पदवी शिक्षण घेतले आहे. त्यानंतर येथील चाचा नेहरू हिंदी हायस्कूलमध्ये सन २००३ मध्ये शिक्षक पदावर नियुक्ती मिळविली. शासन नियमानुसार शिक्षकाच्या नोकरीसाठी बीएड करणे आवश्यक असल्याने त्रिपाठी याने गुरूनानक कॉलेजशी संपर्क केला.मात्र त्यांना भांडूप येथील गुरूनानक कॉलेजमध्ये बीएड पदवी शिक्षणासाठी लागणारे गुण कमी होते. त्यामुळे शैक्षणिक पदवीच्या गुणपत्रिकेतील गुण वाढवून ती गुरूनानक कॉलेजमध्ये सादर करीत बीएड पदवी घेतली. ही बाब शाळा संचालकांकडे उघडकीस आल्यानंतर त्यांनी कारवाई केली. त्यांच्या कारवाईस त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. निकालानंतर शाळेतील शिक्षक प्रदिप पाल यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात रविंद्रनाथ त्रिपाठी याच्या विरोधात शाळा व्यवस्थापनास फसविल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून पोलीसांनी अद्याप त्रिपाठी यांस अटक केलेली नाही.