Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या 'लोकल' वेळापत्रकात बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:32 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर धावतील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी १४ लोकलमध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावर १४ विशेष लोकल धावणार आहेत.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली आहे. मात्र या लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने आता रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येण्याचे नियोजन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. नुकताच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या लोकल मध्ये फिजिकल डिस्टन्स न पाळता प्रवाशांचा प्रवास हजोत होता. कारण लोकल संख्या कमी आणि रेल्वे कर्मचारी जास्त होते. काही रेल्वे कर्मचारी उभे राहून प्रवास करत होते. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. -----------------पश्चिम रेल्वे मार्गावर धावतील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी १४ लोकलमध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावर १४ विशेष लोकल धावणार आहेत. या लोकल फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. विरार ते चर्चगेट या दरम्यान या लोकल   चालविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :मुंबईलोकल