पंधराशे पोलिसांच्या ठाण्यात बदल्या
By Admin | Updated: May 29, 2015 23:21 IST2015-05-29T23:21:15+5:302015-05-29T23:21:15+5:30
शहर पोलीस आयुक्तालयातील खंडित आणि अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या आणि प्रशासकीय कारणास्तव सुमारे १५०० पोलिसांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत.

पंधराशे पोलिसांच्या ठाण्यात बदल्या
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयातील खंडित आणि अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या आणि प्रशासकीय कारणास्तव सुमारे १५०० पोलिसांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच त्यांच्या राहत्या घराजवळचे पोलीस दलातील ६ पर्याय दिले गेले होते. त्यानुसार, ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार बदल्या केल्या आहेत. मात्र, उर्वरितांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊनच त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जवळपास बदल्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस दलात एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा करणाऱ्या खंडित आणि अखंडित १ हजार २६३, तर प्रशासकीय कारणास्तव (विनंती, अडचणी, तक्रारी) २३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच परिमंडळे असून त्यात ३३ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. या बदल्यांमध्ये पोलीस जमादार, शिपाई, नाईक, हेडकॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.
पारदर्शकता ठेवून या बदल्या करण्याकडे प्रामुख्याने भर दिला आहे. ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीनुसार बदल्या करण्यात यश आले आहे. उर्वरितांनी केलेल्या मागणीनुसार तेथे जागा नसल्याने त्यांच्याशी करून चर्चा त्या ठिकाणच्या जवळपास बदल्या केल्या आहेत.
-शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर
४ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पोलिसांच्या कौटुंबिक अडीअडचणींचा विचार
करून त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ५ किलोमीटर अंतरावरील पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यावर भर दिला.
४संबंधितांना काही अडचण असेल तर त्यांना ६ पोलीस स्टेशनचे पर्याय उपलब्ध करून दिले होते.
४त्याबरोबरच त्यांनी दिलेल्या पर्यायांच्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल तर त्यांच्याशी चर्चा करून बदल्या करण्यात आल्या आहेत.
४ज्यांनी पोलीस ठाण्यात काम केलेले नाही, त्यांच्या पोलीस ठाण्यात बदल्या केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पद संख्या
१) जमादार- २१७
२) हेडकॉन्स्टेबल-४२६
३) पोलीस नाईक-५०५
४) कॉन्स्टेबल-३४६
५) एकूण- १४९४