मुंबई विद्यापीठाच्या सीए, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:30 IST2017-11-04T02:30:37+5:302017-11-04T02:30:58+5:30

मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षाचा पेपर आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा न बदलल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका होता.

Changes in the examination schedule of the commerce branch of the Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या सीए, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाच्या सीए, वाणिज्य शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षाचा पेपर आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा न बदलल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका होता. पण, परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यापीठाने द्वितीय वर्षाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आधीच विद्यापीठातील निकालगोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त होते. त्यात दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रक बदलण्याची मागणी होत होती. त्यानुसार द्वितीय वर्ष बीकॉम (सत्र-३) आणि द्वितीय वर्ष बीकॉम (अकाउंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स) (सत्र-३)च्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला. वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाच्या आणि सीए (सनदी लेखापाल) परीक्षा एकाच वेळेस आल्याने बदल केल्याचे परीक्षा विभागाने जाहीर केले. त्यानुसार ९, १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी होणाºया परीक्षा अनुक्रमे १८, २५ आणि २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत.

Web Title: Changes in the examination schedule of the commerce branch of the Mumbai University