महापालिकेच्या ३० प्रभागांच्या सीमारेषेत बदल

By Admin | Updated: January 9, 2017 07:13 IST2017-01-09T07:13:51+5:302017-01-09T07:13:51+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांच्या सीमारेषांबाबत राजकीय प्रतिनिधींसह अनेकांनी हरकती

Changes in the boundaries of the 30 wards of the municipal corporation | महापालिकेच्या ३० प्रभागांच्या सीमारेषेत बदल

महापालिकेच्या ३० प्रभागांच्या सीमारेषेत बदल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांच्या सीमारेषांबाबत राजकीय प्रतिनिधींसह अनेकांनी हरकती नोंदवल्या होत्या. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ६२९ आक्षेपांपैकी केवळ २८ आक्षेपांची नोंद घेण्यात आली असून, २२७पैकी केवळ ३० प्रभागांच्या सीमारेषांत बदल करण्यात आले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग रचनेविरोधात ६२९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ २६६ आक्षेपधारकांनी महापालिकेकडे सुनावणीदरम्यान हजेरी लावली. निवडणूक विभागाने २८ आक्षेप मंजूर केले असून, ६०१ आक्षेप नामंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in the boundaries of the 30 wards of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.