'अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकारची जागा बदला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 04:24 IST2018-10-26T04:24:20+5:302018-10-26T04:24:24+5:30
अपघातानंतर प्रस्तावित शिवस्मारकारची जागा बदलण्याची मागणी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे.

'अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकारची जागा बदला'
मुंबई : अपघातानंतर प्रस्तावित शिवस्मारकारची जागा बदलण्याची मागणी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे.
या स्मारकारच्या पायाभरणीचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र, या समारंभाला जाणारी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत सिद्धेश पवार, या युवा चार्टड अकाउंटन्टचा दुर्देवी मृत्यू झाला. या बोटीत असलेले वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार सुदैवाने वाचले.
बोटीत विशेष निमंत्रित मंडळी असताना त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. प्रस्तावित शिवस्मारकाची जागा गिरगाव चौपाटी आणि राजभवनापासून सुमारे १.५ कि.मी. अंतरावर आहे. भरतीच्या वेळी समुद्रात उसळणाऱ्या लाटा, आपल्याकडील बोटींची दुरवस्था लक्षात घेता या स्मारकापर्यंत पोहोचणे जिकरीचे होऊ शकते. त्यामुळे पर्यायी जागेचा सरकारने विचार करावा, अशी मागणी खेडेकर यांनी केली आहे.