Join us

चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 17:51 IST

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे. 

मुंबई/ नवी दिल्ली: आजचा दिवस आणि संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांची वेळ, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. चांद्रयान-३ च्या लॅण्डिंगला काही मिनिटेच उरले आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे. 

चांद्रयान-३चं सॉफ्ट लँण्डिंग होणार असून याची उत्सुकता सर्वांनाच आहे.आकाशगृहामध्ये  नक्की काय चालतं? तसंच चांद्रयान-३ बद्दल जाणून घेण्यासाठी आज मुंबईतल्या वरळी नेहरू तारांगण सेंटर येथे लाईव्ह स्ट्रिमिंग ठेवण्यात आले आहे. यावेळी अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार चांद्रयान-३चं लँडिंग लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी मुंबईतील वरळी नेहरू तारांगण येथे दाखल झाले आहेत. 

नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास तो लगेच आपलं काम सुरू करेल. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यामधून प्रज्ञान हा सहा पायांचा रोव्हर बाहेर येईल. त्याल इस्त्रोकडून कमांड मिळताच तो चंद्राच्या पृष्टभागावर चालेल. तो ५०० मीटरपर्यंत जाऊन पाणी आणि तेथील वातावरणाबाबतची माहिती इस्रोला देईल. यादरम्यान प्रज्ञान त्याच्या चाकांवर लावलेले अशोक स्तंभ आणि इस्रोच्या चिन्हाची छापही चंद्रावर सोडेल. केंद्राकडून कमांड मिळाल्यानंतर लँडर मॉड्यूल त्याचे इंजिन सुरू करेल आणि मिशन ऑपरेशन्स टीम त्याला सतत कमांड पाठवेल.

लँडिंगनंतर काय होणार?

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर परस्परांची छायाचित्रे टिपणार असून ती पृथ्वीवर पाठवतील.

टॅग्स :चंद्रयान-3शरद पवारइस्रो