जुचंद्रच्या डोंगरमाथ्यावर वसलेली चंडीकादेवी
By Admin | Updated: September 27, 2014 23:04 IST2014-09-27T23:04:29+5:302014-09-27T23:04:29+5:30
वसई-विरार मधील नायगांव पुर्वेस असलेल्या जुचंद्र गावात o्री चंडीकादेवीचे मंदिर आहे. ही भक्तांच्या हाकेला धावुन जाणारी देवी अशी भाविकांची o्रद्धा आहे.

जुचंद्रच्या डोंगरमाथ्यावर वसलेली चंडीकादेवी
>वसई : वसई-विरार मधील नायगांव पुर्वेस असलेल्या जुचंद्र गावात o्री चंडीकादेवीचे मंदिर आहे. ही भक्तांच्या हाकेला धावुन जाणारी देवी अशी भाविकांची o्रद्धा आहे. येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव काळात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. येथील मंदिरात कालीकादेवी, महीषासुरमर्दिनी व चंडीकादेवी या तिन्ही मातांच्या मूत्र्या आहेत.
या मंदिराच्या न्यासाने नुकतेच या मंदिरात विविध विकासकामे करून 5 मजली भव्य मंदिर उभारले आहे. या नुतनीकरणास भक्तांनी सढळहस्ते मदत केली. यंदाही नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने न्यासातर्फे जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात चंडीका देवीच्या यात्रेचे शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले जाते. या यात्रेमध्ये मुंबई व ठाणो परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने जुचंद्र येथे येत असतात. या यात्रेदरम्यान अनेक परराज्यातील व्यापारी आपला माल विक्रीसाठी जुचंद्र येथे घेऊन येतात. तसेच यात्रेमध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम ठेवण्यात येत असल्याने बालगोपाळांचाही चांगला प्रतिसाद लाभतो. गेल्या काही वर्षात या न्यासातर्फे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सध्या मातेच्या दर्शनासाठी भाविक प्रचंड गर्दी करीत आहेत. (वार्ताहर)