ठाण्याचे चौक होणार चकाचक

By Admin | Updated: June 20, 2015 23:21 IST2015-06-20T23:21:04+5:302015-06-20T23:21:04+5:30

महापौर मॅरेथॉन आणि कबड्डी स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शहरातील चौक आणि रस्ता दुभाजकांच्या सुशोभित

Chanchak will be held at Thane Chowk | ठाण्याचे चौक होणार चकाचक

ठाण्याचे चौक होणार चकाचक

ठाणे : महापौर मॅरेथॉन आणि कबड्डी स्पर्धा प्रायोजकांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शहरातील चौक आणि रस्ता दुभाजकांच्या सुशोभित करण्यासाठीही पालिका आता प्रायोजक अथवा विकासकांचा आसरा घेणार आहे. यावरील खर्च पेलवणे कठीण जात असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार या संदर्भातील पत्र शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आले होते. त्याला सर्व पक्षीय सदस्यांनी अनुमोदन देऊन या उपक्रमाला पाठींबा देण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे या चौकांमध्ये ठाणेकरांना ठाण्याचा इतिहास पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला मोठे ५० चौक आहेत. तर १५ हजार चौरस मीटरपर्यंत रस्ता दुभाजक असून ते १८ किमीवर वसले आहेत. दरम्यान हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चौक सुस्थितीत आहेत. उर्वरित चौकांची अवस्था दयनीय असून पालिकेला या चौकांची निगा, देखभाल करणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे शहरातील काही चौक यापूर्वी पालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून तयार करुन घेतले होते. परंतु, आज देखभाली अभावी त्यांचीही अवस्था फारशी चांगली राहिलेली नाही.
आमच्या प्रभागातील चौक आणि डिव्हायडर सुशोभित करा, अशी मागणी नगरसेवक पालिकेकडे वारंवार करत असतात. मात्र, एक चौक सुशोभित करायचा जरी ठरला, तरी त्यासाठी साधारणपणे ५० ते ६० लाखांचा खर्च येत आहे.
शहरात असलेल्या चौकांचे प्रमाण लक्षात घेता, हे सर्वच सुशोभित करण्याचे ठरविल्यास त्यावर होणारा खर्च परवडत नसल्याने अखेर ते प्रायोजकांच्या म्हणजेच खाजगी विकासकांच्या माध्यमातून विकसित करणार आहेत. त्यानुसार शहरात असलेल्या प्रत्येक चौकांची जागा किती आहे, त्याठिकाणी काय करता येऊ शकते, तेथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास होता कामा नये, याची काळजी यामध्ये घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)

विशेष म्हणजे चौक डिझाईन करतांना त्यात ठाण्याविषयीची माहिती, इतिहास असावा असा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. परंतु, या डिझाइनला मंजुरी देण्याचे काम पालिका आणि वाहतूक पोलीस करणार आहेत. तसेच त्याठिकाणी ज्याने चौक सुशोभित केला असेल त्याच्या जाहीरातीसाठी किती जागा असावी याचाही निर्णय पालिका घेणार आहे.

शहरातील
महत्त्वाचे चौक
तिनहानाका, गोल्डनडाईनज, हरिनिवास सर्कल, कापुरबावडी, खोपट,कोर्टनाका, कामगार हॉस्पीटल, क्रीकजंक्शन, गांधीनगर जंक्शन, कळवा शिवाजी हॉस्पीटल, मुंब्रा बायपास, चिंतामणी जंक्शन, मिनाताई ठाकरे चौक, तिन पेट्रोलपंप, खारेगांव, नितिन कंपनी, रेतीबंदर, कॅडबरी, मानपाडा जंक्शन, उथळसर, पातलीपाडा, ब्रम्हांड, कौसा

Web Title: Chanchak will be held at Thane Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.