महाराष्ट्रातील खेळाडू शिस्तप्रिय - रसूल
By Admin | Updated: November 16, 2015 02:30 IST2015-11-16T02:30:31+5:302015-11-16T02:30:31+5:30
महाराष्ट्रातील खेळाडू खुप शिस्तप्रिय आहेत. सगळ््यात महत्तवाचे म्हणजे त्या खेळाडूंच्या अंगी वक्तशीरपणा आहे, असे गौरवोद्गार काश्मीर फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक हिलाल रसूल यांनी काढले.

महाराष्ट्रातील खेळाडू शिस्तप्रिय - रसूल
मुंबई : महाराष्ट्रातील खेळाडू खुप शिस्तप्रिय आहेत. सगळ््यात महत्तवाचे म्हणजे त्या खेळाडूंच्या अंगी वक्तशीरपणा आहे, असे गौरवोद्गार काश्मीर फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक हिलाल रसूल यांनी काढले. आय लीगच्या निमित्ताने मुंबईत आलेले हिलाल यांनी लोकमतशी संवाद साधला.
कुपरेज मैदानावर आय-लीग दुसऱ्या डिव्हीजन सामन्यात काश्मीर एफसी आणि केंकरे एफसी सोमवारी लढतील. काश्मीर पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथील थंड हवामानाचा फारसा परिणाम खेळाडूंवर होत नाही. किंबहुना पावसाळ््यात मुंबईतील खेळाडूंनी तीन ते चार महिने सरावासाठी काश्मीरला यावे, असे हिलाल यांनी सांगितले. काश्मीर संघात महाराष्ट्रातील ३ खेळाडंूचा समावेश आहे.
मुंबईसाठी सात व पुणेसाठी तीन वर्ष खेळलेला कमलजित सिंग काश्मीरच्या कर्णधारापदी आहे. आम्ही विजयाच्या निर्धारानेच मुंबईत आलो आहोत. केंकरे क्लब विरुद्ध आम्ही सर्वोत्तम खेळ करु, असा आत्मविश्वास कर्णधार कमलजितने व्यक्त केला. घरच्या मैदानावर खेळणार असल्याने मोठ्या संख्येने चाहत्यांचा आम्हांला पाठिंबा असेल. तरी, काश्मीर एफसी संघ दडपण झुगारुन खेळला तर प्रेक्षकांना रंगतदार लढतीचा आनंद घेता येईल, असे केंकरे क्लबचे प्रशिक्षक आॅस्कर आॅल्वा यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)