अतिक्रमणांचे आव्हान

By Admin | Updated: January 10, 2015 01:39 IST2015-01-10T01:39:28+5:302015-01-10T01:39:28+5:30

बहुचर्चित नयना प्रकल्पासमोर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचे आव्हान असणार आहे.

Challenge of encroachments | अतिक्रमणांचे आव्हान

अतिक्रमणांचे आव्हान

नारायण जाधव ल्ल ठाणे
बहुचर्चित नयना प्रकल्पासमोर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचे आव्हान असणार आहे. या बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यासाठी धाडसी अधिकारी, राजकीय पाठबळ आणि पोलिसी बळाची गरज लागणार आहे.
‘नयना’ क्षेत्रातील २७० गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, होत आहेत़ ती रोखण्यासाठी सिडकोकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नाही़ सुनील केंदे्रकर यांच्यासारखा कणखर अधिकारी आणला आहे़ मात्र, त्यांनी अद्याप आपली दबंगगिरी दाखविलेली नाही़ नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात आधीच ११६ हेक्टरहून अधिक क्षेत्रात अतिक्रमणे झाली आहेत़ सध्या हाकेच्या अंतरावरील जूगाव, नेरूळ, कोपरी, घणसोली, तळवली यासारख्या भागांत सिडकोच्या नाकावर टिच्चून अनधिकृत बांधकामे होत आहेत़ ही अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे कशी रोखायची, हा प्रश्न आहे़ विशेष म्हणजे नयनातील पहिल्या पायलेट प्रोजेक्टच्या क्षेत्रातही बिल्डरांनी नियम धाब्यावर बसवून वसाहतींचे काम सुरू केले आहे़ मात्र, त्यांच्या मागे राजकीय ‘आर्मस्ट्राँग’ असलेल्या पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याने त्यांचे ‘बुल्स’ चौफेर उधळले आहेत़ (समाप्त)

पुष्पकनगर आणि ‘नयना’त मोठा फरक आहे़ पुष्पकनगर ही नवी मुंबईत विमानतळासाठी बाधित शेतकऱ्यांना मोबदला म्हणून ते २२़५ टक्के जे विकसित भूखंड देण्यात येणार आहेत, त्यांची स्वतंत्र वसाहत आहे़ या वसाहतीचे क्षेत्र सुमारे ८० हेक्टर आहे़ या ठिकाणीही सर्व पायाभूत सुविधा सिडको पुरविणार आहे़
जी गावे विमानतळामुळे बाधित होणार आहेत, त्यांचेही नजीकच वेगळे पुनर्वसन करण्यात येणार आहे़ तसेच ‘नयना’ हा स्वतंत्र प्रकल्प आहे़ विमानतळ झाल्यावर परिसराचा विकास होणार आहे़ शिवाय, नयनाच्या कार्यक्षेत्रातच जेएनपीटीसह रेवस-आवरे बंदरांचा विकास होत आहे़ तीन राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, विरार-अलिबाग सागरी महामार्ग, रेल्वेचे विस्तीर्ण जाळे या क्षेत्रात राहणार आहे़ शिवाय सेझ, पोर्ट आणि विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टीक बिझनेस वाढणार आहे़

या भागाच्या नजीकच नवी मुंबई, ठाणे, कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडीसह अंबरनाथ-बदलापूर, पनवेल-उरण ही मोठी शहरे आहेत़ शिवाय, न्हावाशेवा-शिवडी सी-लिंकमुळे राजधानी मुंबईसुद्धा आणखी जवळ येणार आहे़ यामुळे भविष्याचा विचार करून ‘नयना’ विकसित होईल.

विकासासाठी उपलब्ध जमीन
सिंचित शेतजमीन१६३
अकृषिक जमीन२१,०७०
बॅरेन लॅण्ड२,७८५
बांधकाम असलेले क्षेत्र२,९८४
खाड्यांनी व्यापलेले क्षेत्र८४८
वनजमीन१२,७०४
डोंगरांनी व्यापलेले क्षेत्र१,२५२
औद्योगिक क्षेत्र१५२
राष्ट्रीय पार्क/अभयारण्य२१०
दगडखाणी३३९
गावठाणांनी व्यापलेले क्षेत्र ७३२
वॉटर बॉडीजनी व्याप्त क्षेत्र १,६०६
इतर२०,६०८
एकूण६५,५५६

Web Title: Challenge of encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.