हैदराबादचे पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 14, 2014 17:45 IST2014-05-14T17:45:46+5:302014-05-14T17:45:46+5:30
सनरायझर्स हैदराबाद विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले आहे.

हैदराबादचे पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान
>ऑनलाइन टीम
हैदराबाद, दि. १४ - सनरायझर्स हैदराबाद विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाबसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले आहे.
नाणेफेक जिंकलेल्या पंजाब संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र पंजाब संघाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. हैदराबाद संघाकडून सलामीला आलेल्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. फिन्चने २० धावा, शिखर धवन ४५ धावा (३७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार), वॉर्नर ४४ धावा आणि नमन ओझाच्या ३६ चेंडूत केलेल्या तडकाफडकी नाबाद ७९ धावांच्या जोरावर हैदराबाद संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या.