Join us

तरुणावर चाकूहल्ला, दहिसरमधील घटना : दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:33 IST

दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागात एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. दहिसर पूर्वच्या ज्ञानेश्वर नगरमधील सिद्धेश्वर चाळीत बुधवारी रात्री हा प्रकार घडला

मुंबई : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागात एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. दहिसर पूर्वच्या ज्ञानेश्वर नगरमधील सिद्धेश्वर चाळीत बुधवारी रात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. बाळकृष्ण नाडर उर्फ पिंटू (२५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडर हा या ठिकाणी रात्री सव्वा बाराच्या सुमारास दारू प्यायला बसला होता. त्या वेळी शंकर वायकर (२७) हे त्या परिसरातून जात होते. त्यांच्याकडे नाडरने दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र त्यांनी नकारदिला.तेव्हा नाडरने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.तेव्हा नाडरने त्याच्या घरात जाऊन भाजी कापण्याचा चाकू आणला आणि वायकर यांच्यावर वार केले. यात त्यांच्या पाठीवर आणि हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :गुन्हामुंबई