विक्रोळीत कार्यालयात घुसून विवाहितेवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:40 IST2017-10-22T02:40:52+5:302017-10-22T02:40:54+5:30

कुर्ल्यातील मारहाणीची घटना ताजी असताना विक्रोळीत कार्यालयात घुसून तरुणाने विवाहितेवर चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.

Chakahala on Married to Vikhroli office | विक्रोळीत कार्यालयात घुसून विवाहितेवर चाकूहल्ला

विक्रोळीत कार्यालयात घुसून विवाहितेवर चाकूहल्ला

मुंबई : कुर्ल्यातील मारहाणीची घटना ताजी असताना विक्रोळीत कार्यालयात घुसून तरुणाने विवाहितेवर चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. साबीर हसन मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. साबीर पीडितेच्या कार्यालयात गेला. तेथे त्याने तिला बाहेर बोलाविले असता तिने त्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या साबीरने तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये चेहरा व हातावर गंभीर दुखापत झाली आहे.

Web Title: Chakahala on Married to Vikhroli office