Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरणार नाट्य परिषदेचा अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 05:30 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नाट्य परिषदेचा भावी अध्यक्ष कोण होणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले. आता शुक्रवार, ६ एप्रिल रोजी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचा फैसला होणार आहे.

- राज चिंचणकरमुंबई  - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नाट्य परिषदेचा भावी अध्यक्ष कोण होणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले. आता शुक्रवार, ६ एप्रिल रोजी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचा फैसला होणार आहे. अध्यक्षपदासाठी अमोल कोल्हे विरुद्ध प्रसाद कांबळी असा थेट सामना या वेळी रंगणार आहे. ‘मोहन जोशी पॅनल’ आणि ‘आपलं पॅनल’च्या सदस्यांनी यासाठी यापूर्वीच मोर्चेबांधणी केली असून, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सदस्यांची मते कुणाच्या पारड्यात पडतात, यावर या कार्यकारिणीवर कुणाचे वर्चस्व राहील हे निश्चित होणार आहे. बहुमतासाठी ६० सदस्यांच्या संख्याबळातून ३१ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. आमचीच सत्ता येणार, असा दावा दोन्ही पॅनल्सकडून केला जात असल्याने, या दिवशी नक्की काय होणार याची उत्कंठा वाढली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रकरमणूकबातम्या