छेड जिवावर बेतली
By Admin | Updated: August 24, 2014 01:39 IST2014-08-24T01:39:56+5:302014-08-24T01:39:56+5:30
तरुणीची छेड काढून पळणा:या तरुणाचा 2क् फूट खड्डय़ात पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात घडली.

छेड जिवावर बेतली
मुंबई : तरुणीची छेड काढून पळणा:या तरुणाचा 2क् फूट खड्डय़ात पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात घडली. या घटनेची पंतनगर पोलिसांनी नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.
गणोश साळवे (26) असे या तरुणाचे नाव असून, तो याच परिसरातील संक्रमण शिबिरात कुटुंबीयांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री त्याने याच परिसरातील बस थांब्यावर बसची वाट पाहत असलेल्या तरुणीची छेड काढली. तरुणीने वेळीच आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील काही रहिवाशांनी गणोशच्या दिशेने धाव घेतली. रहिवासी आपल्या दिशेने येताच त्याने याच परिसरात सुरू असलेल्या एसआर इमारतीकडे पळ काढला. त्याच वेळी या परिसरातील पोलीस चौकीतील काही पोलीसदेखील त्या ठिकाणी दाखल झाले. पोलीस आपल्याला पकडून मारतील, या भीतीने गणोश इमारतीवर चढण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला आहे. गणोश जीव वाचवण्यासाठी धावत असतानाच तोल जाऊन या खड्डय़ात पडला. खड्डा 2क् फूट खोल असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. अखेर पोलिसांनी अग्निशमन दलाला माहिती देऊन या तरुणाचा शोध सुरू केला. (प्रतिनिधी)
च्गणोशचा तासभर त्याचा शोध घेतल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. दुसरीकडे गणोशचा मृत्यू हा खड्डय़ामुळे झाल्याने संतापलेल्या रहिवाशांनी विकासकाच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटनाही घडली आहे.