१८ महिन्यांत सीईटीपी उभारणार?
By Admin | Updated: November 30, 2014 22:50 IST2014-11-30T22:50:24+5:302014-11-30T22:50:24+5:30
तारापूर एमआयडीसीतील टीमाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या जाहीर जनसुनावणीत अध्यक्षस्थानी पालघर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर होते

१८ महिन्यांत सीईटीपी उभारणार?
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील एस-३० या भूखंडावर तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) ५० दशलक्ष लीटर क्षमतेचा प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा (सीईटीपी) उभारणीसाठी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. त्या वेळी उपस्थितांनी सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला, तर अनेकांनी सांडपाण्याच्या प्रदूषणासंदर्भात संतापही व्यक्त केला.
तारापूर एमआयडीसीतील टीमाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या जाहीर जनसुनावणीत अध्यक्षस्थानी पालघर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर होते. जनसुनावणी प्रक्रियेच्या नोंदणीसाठी या नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन.जी. निहूल, तारापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय भोसले उपस्थित होते. जनसुनावणीमध्ये आक्षेप, सूचना व हरकती नोंदविण्याकरिता नवापूर, नांदगाव, आलेवाडी, मुरबे, कुंळवली, कोतवडे, सालवड, बोईसर, खैरपाडा आदी गावांचे काही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच बोईसरचे आमदार विलास तरे उपस्थित होते. (वार्ताहर)