मुंबई :
महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्वाइकल कॅन्सर) रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशभरातील १४ वर्षे वयोगटातील मुलींचे 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (एचपीव्ही) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुलींना 'गार्डसिल' ही ३,९२७ रुपयांची लस एकाच डोसच्या स्वरूपात देण्यात येत आहे. 'गार्डसिल' ही लस एकाच डोसच्या स्वरूपात मोफत देण्यात येणार असून, या मोहिमेमुळे लाखो मुलींना भविष्यातील कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लसीकरण केल्यास सर्वाइकल कॅन्सरचा धोका कमी करता येतो. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. ग्रामीण व अल्पसुविधा असलेल्या भागांत तपासणीअभावी उशिरा निदान होते, त्यामुळे मृत्यूदर जास्त आहे.
लसीकरणाने धोका टळेलहा लसीकरणाने टाळता येणारा कर्करोग आहे. सन २०२२ मध्ये भारतातील कर्करोगाचा प्रादुर्भाव १ लाख महिलांमागे १७.७ टक्के इतका होता.
पालिकेचा आरोग्य विभाग सज्जया मोहिमेसाठी मुंबई महानगरपालिकेस लसीच्या २० हजार १६० मात्रा प्राप्त झाल्या आहेत. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकास्तरीय अधिकारी, २६२ वैद्यकीय अधिकारी, १००८ परिचारिका, ४४२८ आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार होणार कमी१. एचपीव्ही हा विषाणू असून त्याच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखातील पेशींमध्ये बदल होऊन पुढे कर्करोग होऊ शकतो. दीर्घकाळ संसर्ग राहिल्यास धोका वाढतो. योग्य वयात एचपीव्ही लस घेतल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकते. त्यामुळे लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. या लसीची किंमत ३,९२७ रुपये प्रति डोस आहे. सरकारकडून ही लस मोफत देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल.
२. मोहिमेंतर्गत 'गार्डसिल-४' या एचपीव्ही लसीची एक मात्रा (०.५ मिली) डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जाणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून, पालकांच्या संमतीची आवश्यकता आहे. एचपीव्ही लसीकरणासाठीची नोंदणी 'यु-विन' पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.
Web Summary : Government provides free HPV vaccine to 14-year-old girls nationwide, preventing cervical cancer. The 'Gardasil' vaccine, costing ₹3,927, will be given as a single dose, protecting millions. Mumbai receives 20,160 doses; health workers are trained for the campaign. This reduces the economic burden on families.
Web Summary : सरकार गर्भाशय कैंसर को रोकने के लिए देश भर में 14 वर्षीय लड़कियों को मुफ्त एचपीवी टीका प्रदान करती है। 'गार्डसिल' टीका, जिसकी कीमत ₹3,927 है, एक खुराक के रूप में दिया जाएगा, जिससे लाखों लड़कियों की सुरक्षा होगी। मुंबई को 20,160 खुराकें मिलीं; स्वास्थ्य कार्यकर्ताओं को अभियान के लिए प्रशिक्षित किया गया। इससे परिवारों पर आर्थिक बोझ कम होगा।