Join us

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:42 IST

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा ते खडवलीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा ते खडवलीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी टिटवाळ्याच्या दिशेने चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. तसेच नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही उशीर होणार असल्याने प्रवाशांना दगदग सहन करावी लागणार आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलमध्ये रेल्वे