मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; धीम्या मार्गावर गर्दी
By Admin | Updated: May 11, 2015 00:57 IST2015-05-11T00:57:24+5:302015-05-11T00:57:24+5:30
मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मशीदसह वडाळारोड-माहीम स्थानकांदरम्यान अप दिशेवर रविवारी स. ११.१० ते दु. ३.४० आणि स. ११.३० दु. ३.३० या कालावधीत ब्लॉक घेण्यात आले.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; धीम्या मार्गावर गर्दी
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मशीदसह वडाळारोड-माहीम स्थानकांदरम्यान अप दिशेवर रविवारी स. ११.१० ते दु. ३.४० आणि स. ११.३० दु. ३.३० या कालावधीत ब्लॉक घेण्यात आले. या वेळी मुख्य मार्गावरील सर्व गाड्या अप धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील फलाटांमध्ये तुडुंब गर्दी दिसून आली.
तसेच दादर-रत्नागिरी ही गाडी दिव्यातूनच परतीच्या मार्गावर धावली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचीही दिव्यात एकच गर्दी झाली होती. हार्बरच्या कुर्ला-मशीद मार्गावर ब्लॉक असल्याने अपच्या गाड्या ब्लॉकच्या कालावधीत कुर्ला-भायखळादरम्यान जलद मार्गावरून धावल्या.
वडाळा रोड-वांद्रा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर ब्लॉक असल्याने अंधेरी/वांद्रा-सीएसटी ही अप/डाऊन दोन्ही दिशांवरील उपनगरीय वाहतूक ब्लॉकच्या कालावधीत रद्द होती. (प्रतिनिधी)