मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By Admin | Updated: September 19, 2015 23:33 IST2015-09-19T23:33:57+5:302015-09-19T23:33:57+5:30

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी, वडाळा रोड-माहीम या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर रविवारी स. १०.३० ते दु. ३ आणि स. ११.३० ते दु. ३.३०

Central Railway Megablocks | मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी, वडाळा रोड-माहीम या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर रविवारी स. १०.३० ते दु. ३ आणि स. ११.३० ते दु. ३.३० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे डाऊन जलदची वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून त्या लोकल ठाणे-कल्याण मार्गावर सर्व स्थानकांत थांबतील. तर नेत्रावती ही एलटीटीहून स. ११.४० ऐवजी दु. २.३० ला सुटेल. हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी, वडाळा रोड-माहीम मार्गावर दोन्ही दिशांवर ब्लॉक असून त्या कालावधीत पनवेल/ बेलापूर/वाशी येथून सीएसटीसाठी तसेच तेथून त्या स्थानकांसाठीची वाहतूक रद्द करण्यात येणार आहे. तसेच बांद्रा-अंधेरीहून सीएसटीची अप/डाऊनची वाहतूक रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला-पनवेल मार्गावर अप/डाऊनवर कुर्ल्यातून फलाट ८ वरून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. रविवारी गौरी भोजनाचा दिवस असतांनाच हे ब्लॉकचे संकट भक्तांवर ओढावले आहे.

Web Title: Central Railway Megablocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.