मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By Admin | Updated: January 10, 2015 22:45 IST2015-01-10T22:45:22+5:302015-01-10T22:45:22+5:30
ठाणे-कल्याण जलद मार्गासह नेरूळ-मानखुर्द मार्गावरील डाऊन-अप दोन्ही दिशांवर रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
डोंबिवली : ठाणे-कल्याण जलद मार्गासह नेरूळ-मानखुर्द मार्गावरील डाऊन-अप दोन्ही दिशांवर रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. ११ ते दु. ३ या कालावधीत जलद मार्गावर आहे. यामुळे जलदची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून या गाड्या सर्व स्थानकांवर थांबविण्यात येणार असल्याचे म.रे.च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.
या कालावधीत जलद मार्गावरील डाऊनवरून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यादेखील धीम्या मार्गावरून धावणार आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नेत्रावती एक्स्प्रेस नियोजित वेळेत एलटीटीहून निघणार नसून ती दु.२.३० वा. तेथून सुटणार असल्याचे सांगण्यात आले. नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यानही अप/डाऊन दोन्ही दिशांवर वरील कालावधीत ब्लॉॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत वाशी/पनवेल/बेलापूर येथून सीएसटीसाठी तसेच सीएसटीहून त्या स्थानकांसाठी सुटणाऱ्या गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ट्रान्स-हार्बरच्या ठाणे-पनवेलसह हार्बरच्या सीएसटी-मानखुर्द स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)