Join us

ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 09:28 IST

मध्य रेल्वेच्या मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंबई - आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्यात ट्रॅक ओलांडताना लोकलखाली येऊन एकाचा मृत्यू झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

मध्य रेल्वेच्या मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही घटना घडली. याचा परिणाम हा ठाण्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीवर झाला आहे. जलद मार्गावरील वाहतूकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

 

 

 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबईमध्य रेल्वेलोकल