मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या सेवेचा खोळंबा झाला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ठाण्याच्या दिशेनं जाणारी एकही लोकल न आल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. कर्मचारी कामावरुन घरी जात असताना लोकल सेवा कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 20:50 IST