मुंबई - मध्य रेल्वेवरील उंबरमाळी रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरुन घसरल्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास व्हॅन रुळावरुन घसरली. व्हॅन हटवण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघात नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या खोळंब्यामुळे सकाळपासून कसारा स्थानकातून एकही लोकल न सुटल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन केले होते. दरम्यान, लांब पल्ल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून इगतपूरीपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या आहेत.
एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणामa) 12859 मुंबई-हावडा गितांजली एक्स्प्रेसb) 17617 मुंबई-हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेसc) 11055 एलटीटी- गोरखपूर एक्स्प्रेसया सर्व एक्स्प्रेस कल्याण-कर्जत-लोणावळा-पुणे-दौड- मनमाड मार्गे वाहतूक वळवण्यात आल्या आहेत.
11026 पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, दौड-मनमाड मार्गे वळवण्यात आलेली एक्स्प्रेस
रद्द करण्यात एक्स्प्रेस
a) 12118/12117 मनमाड-एलटीटी मनमाड गोदावरी एक्स्प्रेसb) 22102/22101 मनमाड-मुंबई-मनमाड-राज्यराणी एक्स्प्रेसc) 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर
एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदलa) 12542 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस दुपारी 1.20 hrs वाजता सोडण्यात आली. b) 11061 एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस दुपारी 2 वाजता सोडण्यात आली.c) 11071 एलटीटी- वाराणसी कन्याकुमारी एक्स्प्रेस दुपारी 2.30 वाजता सुटणार प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत रेल्वे प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली आहे.