मध्य रेल्वेने मार्च ते नोव्हेंबरदरम्यान बांधले चार पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST2020-12-05T04:10:16+5:302020-12-05T04:10:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली ...

The Central Railway built four pedestrian bridges between March and November | मध्य रेल्वेने मार्च ते नोव्हेंबरदरम्यान बांधले चार पादचारी पूल

मध्य रेल्वेने मार्च ते नोव्हेंबरदरम्यान बांधले चार पादचारी पूल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. कुर्ला - शीव (स्वदेशी मिल), डोंबिवली, ठाकुर्ली आणि टिटवाळा येथे नवीन पादचारी पूल बांधण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सँडहर्स्ट रोड, भायखळा (२), परळ, दादर, शीव, मुलुंड (२), ठाणे, कळवा (२), किंग्ज सर्कल (२), पनवेल (२) तसेच उल्हासनगर, बदलापूर, खडवली, वाशिंद, आसनगाव, इगतपुरी, भिवंडी रोड, खामण रोड, खारबाव, जुचंद्र, निळजे, दातीवली, तळोजा, कळंबोली, चौक आणि मोहोपे या २८ स्थानकांवर ३२ पादचारी पुलांच्या दुरुस्तीचे काम यशस्वीरीत्या पार पडले. कल्याण येथील खर्डी, उंबरमाळी, शीळफाटा आणि ब्रिटिश काळातील वालधुनी रोड ओव्हर ब्रिजच्या रस्त्यांच्या पुलांची दुरुस्ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

अलीकडेच पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिजसाठी व्यस्त रेल्वे ट्रॅक ओलांडून नवीन स्टील ‘ओपन वेब गर्डर’ यशस्वीरीत्या लाँच केले गेले. कल्याण आणि डोंबिवली दरम्यान १९१४ मध्ये बांधलेला पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज काही काळापूर्वी काढण्यात आला.

जुने पादचारी पूल काढून टाकण्यात आले

वडाळा रोड येथील जीर्ण पादचारी पुलांचे २ स्टील स्पॅन, अंबरनाथ येथील पादचारी पुलाचा एक स्पॅन, आंबिवली येथे एक स्पॅन, अटगाव येथे २ स्पॅन, वाशिंद रेल्वे स्थानकातील १०० वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पुलांचे दोन स्पॅन्स काढून टाकण्याचे काम करण्यात आले.

Web Title: The Central Railway built four pedestrian bridges between March and November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.