Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:06 IST

श्रींच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने रविवार, २३ सप्टेंबर रोजीचा ब्लॉक रद्द केला आहे.

मुंबई : श्रींच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने रविवार, २३ सप्टेंबर रोजीचा ब्लॉक रद्द केला आहे. यामुळे मध्यसह हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून श्रींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होते. एकाच वेळी अनेक रूपात असलेल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी दुतर्फा रांगा लागतात. त्यामुळे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि विसर्जन मिरवणुकीनंतर भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.>विशेष लोकलअनंत चतुर्दशीच्या मध्यरात्री मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेस ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार मार्गावर विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :लोकल