पालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:02 IST2021-03-30T04:02:17+5:302021-03-30T04:02:17+5:30

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. मुंबई पालिकेने वयोवृद्ध, अंध व्यक्ती, शारीरिक ...

The central government rejected the municipality's proposal for home vaccination | पालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

पालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. मुंबई पालिकेने वयोवृद्ध, अंध व्यक्ती, शारीरिक अपंगत्व असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने घरोघरी लसीकरणासाठी कोणतेही धोरण नसल्याचे सांगत हा प्रस्ताव नाकारला आहे.

लसीकरण केंद्रांचा विस्तार काही प्रमाणात छोट्या-छोट्या लसीकरण केंद्रांपर्यंत लहान स्तरापर्यंत केला जाणार आहे. जेणेकरून लोकांना कोविडची लस घेण्यासाठी दोन किलोमीटरच्या पुढे प्रवास करावा लागणार नाही. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिक हे वृद्ध, काही जण अंथरुणावर तर काही जण अपंग आहेत. जे लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाहीत. यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले होते. या पत्रात अशा नागरिकांना घरी जाऊन लस देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, केंद्राने असे कोणतेही धोरण नसल्याचे सांगितले.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या स्पष्टीकरणानुसार, देश सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहे. अशात जास्तीतजास्त लोकांना लसीकरण मिळावे यासाठी केंद्राने खूप छोट्या स्तरावरील लसीकरण कार्यक्रमाची योजना आखली आहे. लसीकरणासाठी रुग्णालयात जाण्यासाठी बऱ्याच लोकांना अडचण आहे. रुग्णालयात गेल्यास कोरोनाचा संसर्ग होईल, अशी नागरिकांना भीती आहे. पुढे त्यांनी सांगितले की, केंद्राची लसीकरण सूक्ष्म पातळीवर नेण्याची योजना असून या योजनेत नागरिकांना लसीकरणासाठी दोन किमीपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा एक सर्वांत प्रभावी मार्ग आहे.

Web Title: The central government rejected the municipality's proposal for home vaccination