Join us  

मध्य-पश्चिम रेल्वेवर 47 वातानुकूलित लोकल; मोफत वायफाय देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 4:58 PM

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेची आढावा बैठक घेतली.

मुंबई : मुंबई सेंट्रल स्थानकाचा नामांतर प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे येत्या 10 दिवसात प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर लगेचच रेल्वे मंत्रालय मंजुरी देणार असल्याचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत सांगण्यात आले. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार मंगल प्रभात लोढाही उपस्थित होते. तसेच 47 वातानुकूलित लोकलसाठी आज निविदा मागवण्यात आली. ही निविदा इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांनी मागवल्या असल्याचे रेल्वे मंत्र्यांचे सचिव नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 

रेल्वेच्या सुरक्षेसाठी 41 एक्सप्रेसला अपघात रोधक बोगी बसविण्य़ात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर विमानतळाच्या धर्तीवर संथ संगीत सुरु करण्याचा ही निर्णय घेण्यात आला. याचबरोबर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले. या पूर्वी केवळ अ 1 आणि अ स्थानकावर वाय फाय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.

टॅग्स :रेल्वेलोकलपीयुष गोयलमुंबई