Join us  

दर्जात्मक रुग्णसेवा हा केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:59 AM

आरोग्यसेवा हा भारतीय राज्यघटनेत केंद्रापेक्षा राज्याचा विषय असल्याने राज्य तसेच जिल्हा पातळीवर अशी योजना घडवणे जास्त योग्य असते.

- स्नेहा मोरेमुंबई : आरोग्यसेवा हा भारतीय राज्यघटनेत केंद्रापेक्षा राज्याचा विषय असल्याने राज्य तसेच जिल्हा पातळीवर अशी योजना घडवणे जास्त योग्य असते. केंद्र सरकार सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदेशीर तरतुदींचे पाठबळ देऊ शकते. डॉक्टरांच्या संघटनांनी वैद्यकीय क्षेत्रात संरचनात्मक आणि लोकाभिमुख बदल घडवण्यासाठी खुल्या मनाने सहभाग देऊ केला पाहिजे. सरकारने ‘सरकारीकरणा’चा कालबाह्य मार्ग सोडून नव्या युगाच्या कल्पना व स्वदेशी प्रारूपे स्वीकारणे आवश्यक असून हे येत्या नव्या वर्षात आरोग्यसेवा क्षेत्रासमोर मोठे आव्हान असणार आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपासून रोगनिदानासाठी करण्याच्या चाचण्या, रुग्णांचे वैद्यकीय तपशील आणि विम्याची प्रकरणे ही डिजिटल होणार आहेत. डिजिटायझेशनच्या या प्रक्रियेमध्येच नवउद्योजकांसाठी अनेक संधी दडल्या आहेत.\आॅनलाइन फार्मसी निर्णायककेंद्र शासनाने आॅनलाइन फार्मसीच्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मसुदा तयार केला; मात्र दुसरीकडे नुकतेच दिल्ली आणि मद्रास येथे आॅनलाइन फार्मसीच्या क्षेत्राला चाप लावून आॅनलाइन औषध विक्रीवर बंदी घातली आहे. ७०-७५ वर्षांपूर्वीच्या औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यात नव्या युगाच्या दृष्टीने बदल होणे आवश्यक आहे. समाविष्ट औषधांची यादी, त्यांची प्रमाणभूतता, त्यांची विक्री ट्रॅक करणे, अप्रमाणित औषधे समाविष्ट होऊ न देणे, व्यसने निर्माण करणारी आणि धोकादायक औषधे वगळणे याची तरतूद केलेली आहे. डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन्स ही ई-प्रिस्क्रिप्शन्स असावीत याचाही समावेश केलेला आहे. गैरफायदा घेणाऱ्या व्यक्ती कायद्याच्या कचाट्यापासून वाचू शकणार नाहीत याचीही काळजी घेतली गेली आहे.जेनेरिक औषधेगेल्या काही वर्षांपासून जेनेरिक औषधांविषयी जनजागृती करून अंमलबजावणीला यश आलेले दिसून येत नाही. जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डेड औषधांची किंमत त्यांच्या जेनेरिक उत्पादनांपेक्षा सर्वसाधारणपणे पाच ते दहा पट महाग असल्याचे दिसते. देशातील कंपन्या ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात करतात. दीर्घकालीन औषधे आवश्यक असतात, या आजारांच्या रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल. याकरिता, गेल्या दशकांपासून आरोग्यसेवा क्षेत्रातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेतबदलांच्या स्पर्धेत रुग्णसेवा हा केंद्रबिंदूअन्य क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्र असो वा आरोग्यसेवांचे क्षेत्र हे वेगाने कात टाकत आहे. मात्र हे बदल होत असताना दोन्ही क्षेत्रांनी रुग्णसेवा केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे. डिजिटल युगात अनेक बदल होत असताना या क्षेत्राचा फायदा करून घेत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविणे हे ध्येय बाळगले पाहिजे. गेल्या वर्षात आरोग्यसेवा क्षेत्रानेही अनेक चढउतार पाहिले आहेत, मात्र येत्या वर्षासाठी ही नवी आव्हाने पेलून बदल केले पाहिजेत.- डॉ. शैलेश कानविंदे

टॅग्स :आरोग्यमुंबई