मुंबई : केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीला नुकतीच मान्यता दिली आहे. या उपचार पद्धतीच्या वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.या समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.अमेरिका, जपान, चीन, आॅस्ट्रेलिया या देशांत या वैद्यक उपचार पद्धतीला कायदेशीर मान्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये या उपचार पद्धतीचा अभ्यासक्रम व नियमन करणारी यंत्रणा आहे.
अॅक्युपंक्चरला केंद्राची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:07 IST