मराठा समाजाची जनगणना करा - राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 05:54 IST2018-08-05T05:54:13+5:302018-08-05T05:54:15+5:30
मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या तसेच न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यायचे असल्यास त्यांचे मागासलेपण आणि त्यांना योग्य प्रतिनिधित्व नाही हे सिद्ध करावे लागेल.

मराठा समाजाची जनगणना करा - राठोड
मुंबई : मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या तसेच न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यायचे असल्यास त्यांचे मागासलेपण आणि त्यांना योग्य प्रतिनिधित्व नाही हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी या समाजाची लोकसंख्या किती हे प्रत्यक्ष गणनेद्वारे जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरीभाऊ राठोड यांनी व्यक्त केले आहे.
ओबीसी समाजाची जनगणना करणेही गरजेचे आहे. ५२ टक्के ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी आहे. हा मुद्दा भविष्यात न्यायालयासमोर येऊ शकतो. अशावेळी ओबीसींच्या जनगणनेचा आधार आवश्यक असेल, असे राठोड यांनी पत्रकात म्हटले आहे.