Join us  

सेल सुरू ... स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर, 4 दिवस डिस्काऊंट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 2:00 PM

कंपनीच्या या सेलमध्ये ग्राहकाने खरेदी करण्यासाठी Mobikwick चा वापर केल्यास ग्राहकाला 15 टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 4 दिवस वेगवेगळ्या थीम्सवर हा सेल आधारलेला असणार आहे.

मुंबई - चीनची मोबाईल निर्माता कंपनी Realme ने You and Realme Days सेलची घोषणा केली आहे. या सेलचा फायदा ई-कॉमर्स साईट अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपनीच्या वेबसाईटवरुन घेता येणार आहे. 4 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत 4 दिवस या सेलचा लाभ ग्राहकांना घेता येईल. या सेलमध्ये स्मार्टफोनवर डिस्काऊंट आणि ऑफर्स मिळणार आहेत. 

कंपनीच्या या सेलमध्ये ग्राहकाने खरेदी करण्यासाठी Mobikwick चा वापर केल्यास ग्राहकाला 15 टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 4 दिवस वेगवेगळ्या थीम्सवर हा सेल आधारलेला असणार आहे. पहिल्या दिवशी ग्राहक Realme U1 स्मार्टफोनला दुपारी 12 ते 3 या वेळेत खरेदी करु शकतील. तर, सायंकाळी 6 वाजता IST ने खरेदी केल्यास ग्राहकांना Realme Buds मोफत मिळणार आहे. सेलच्या दुसऱ्यादिवशी ग्राहक Realme C1 बजेट स्मार्टफोन खेदी करणाऱ्या ग्राहकास 500 रुपयांच्या चित्रपटाचे तिकीट मोफत देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला Realme 2 Pro च्या ग्राहकांना 500 रुपये किमतीचा गुगल प्ले वाऊचर देण्यात येईल. सेलच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 तारखेला ग्राहकाने रियलमी टेक बॅगपैक्सची दुपारी 12 व 3 वजात आणि सायंकाळी 6 वाजता खरेदी केल्यास ग्राहकांना Realme Buds मोफत मिळणार आहे. 

दरम्यान, डिस्काऊंटचा विचार केल्यास ग्राहकांना Realme U1 साठी 10,999, Realme 2 साठी 9,499 आणि Realme 2 Pro साठी 13,990 रुपये मोजावे लागतील.   

टॅग्स :मुंबईऑनलाइनमोबाइलव्यवसाय